Change Color

लोकांनी लोकांसाठी चालवलेली चळवळ

समविचारी लोकांनी एकत्र येवून स्थापन केलेल्या संस्थेद्वारे सभासदांची सर्वांगीण प्रगती साधने.

समाजातील सर्व स्तरातील लोकांना साधन सुविधा उपलब्ध करून देणे व सभासद तसेच परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देणे.

सहकारी तत्वावर स्थापन झालेल्या संस्थांमधून दैनंदिन उपयोगातील वस्तू उपलब्ध करून देणे.

राज्य सहकारी परिषद कार्यपद्धती

महाराष्ट्र सहकारी संस्था, अधिनियम १९६० चे कलाम १५४ अ(३) मध्ये राज्य सहकारी परिषदेने करावयाची कार्ये नमूद असून त्याच्या तपशील खालील प्रमाणे

सहकारी चळवळीशी संबंधीत बाबींवर राज्य शासनाला सल्ला देणे.

राज्यातील सहकारी चळवळींचा आढावा घेऊन सहकारी संस्थांच्या कार्याचे समन्वय साधनाचे मार्ग सुचविणे.

सहकारी संस्थांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्ग व उपाय सुचविणे.

समाजातील मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गाच्या विकासासाठी असलेल्या विद्यमान परियोजनांचे मूल्यांकन करणे व नवीन परियोजना सुचविणे.

सहकारी पद्धतीद्वारे आर्थिक विकासाच्या विशेष परियोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाला सल्ला देणे.

विभागामार्फत किंवा खास स्थापन केलेल्या मंडळामार्फत उपरोक्त कोणत्याही प्रयोजनासाठी अभ्यास करण्याचे काम हाती घेणे.

राज्य शासन निर्देशीत करील अशा बाबींवर राज्य शासनाला अहवाल देणे.

राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासाबाबतच्या योजना व धोरणे यांची शिफारीश करणे.

About Us Image

मा. ना. देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील 'समृद्ध भारत' ही कल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी सहकार चळवळीस गतवैभव प्राप्त करून देणे आवश्यक आहे. देशाच्या विकासामध्ये महाराष्ट्र राज्याच्या सहकार चळवळीचे योगदान हे अनन्य साधारण असे आहे. महाराष्ट्र राज्यात सहकार चळवळीने केलेले कार्य हे निश्चितच राज्याच्या विकासासाठी मोलाचे ठरले आहे. राज्याची सहकार चळवळ सुदृढ व समृद्ध करण्यासाठी राज्य सहकार सदैव सहकार चळवळीच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहे.

अधिक माहिती

मा. ना. सुभाषबाबू देशमुख

सहकार, पणन व वस्त्रोद्योग

समाजातील विविध घटकांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याची क्षमता सहकार चळवळीमध्ये आहे. त्यासाठी प्रत्येक घटकासाठी सहकारी संस्थ्यांची निर्मिती करण्याकरिता आम्ही कार्यरत आहोत. त्यामुळेच अनेक प्रश्नांची सोडवणूक करणे शक्य होणार आहे.

अधिक माहिती
About Us Image
About Us Image

श्री. शेखर चरेगावकर

अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद

सहकार बंधु-भगिनींनो
मा. ना. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सरकारची स्थापना झाली. मा. मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली सर्व मंत्रिमंडळ राज्याच्या विकासासाठी अहोरात्र कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचा अध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली, याचा मनस्वी आनंद होतो. आजपर्यंत ३० वर्षापर्यंतच्या सहकार क्षेत्रातील कामकाजाच्या अनुभवाच्या आधारे सहकार परिषदेचा अध्यक्ष म्हणून राज्यातील सहकारी चळवळीला गतिमान करणे व गतवैभव प्राप्त करण्यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र अध्यक्ष सहकारी संस्थांच्या कायदा १९६० अधिनियम १९६१ चे (कलम १५४) मध्ये सहकार परिषदेची रचना व कार्यपद्धती याबाबत विस्तृत माहिती आहे. त्या आधारे महाराष्ट्र शासनाला सहकार चळवळीच्या सक्षमीकरणाकरीत विविध योजना सुचविल्या आहेत. सुचविलेल्या बहुतांशी योजना शासनाने सुरूही केलेल्या आहेत, याची सविस्तर माहिती सहकार क्षेत्रातील व्यक्तींना व्हावी व सहकार चळवळ लोकाभिमुख व्हावी, या उद्देशाने संकेतस्थळ सुरु करत आहोत.

Read More
0

एकूण दर्शक

0

आजचे दर्शक

0

सहकार सदस्य